शेतीपूरक व्यवसायांपैकी दुग्धव्यवसाय हा एकमेव व्यवसाय आहे जो शेतकऱ्याला दररोज उत्पन्न देतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सतत द्रवता ठेवतो. मात्र बदलत असलेल्या सामाजिक रचना, कमी होत चाललेली शेतीची जमीन, आणि तरुणांचा शेतीपासून वाढता दुरावा यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत सापडला आहे.
सामाजिक प्रतिष्ठा हरवत चालली – चांगल्या वयातले तरुण शेतकरी विवाहासाठी नकारले जात आहेत. पूर्वी जमीन आणि जनावरे श्रीमंतीचं प्रतीक होती, आता त्याकडे कोणी बघत नाही.
गुणवत्तापूर्ण जनावरांचा खर्च परवडत नाही – उत्तम दूध देणाऱ्या जनावरांचे दर सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
दुधाचे दर कमी, खर्च जास्त – चाऱ्याचे दर, औषधे, मेंढपाळ यांचे वेतन वाढले आहे, पण दुधाला भाव वाढलेला नाही.
२४ तास जबाबदारीचा व्यवसाय – जनावरांची निगा, चारा, दुध काढणे यामुळे तरुण पिढी दूर जात आहे.
बँकांचे पाठबळ नाही – कर्जमाफीच्या चुकीच्या धोरणांमुळे बँका शेतीकडे पाठ फिरवत आहेत.
संपूर्ण संशोधनानंतर SHARE CROPPERS PRIVATE LIMITED ने अशा शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणूक, जास्त पारदर्शकता आणि PPP मॉडेल तयार केला आहे, जो शेतकऱ्याला सन्मान आणि नियमित उत्पन्न देतो.
कोणताही सामान्य शेतकरी सहभागी होऊ शकतो.
प्रथम टप्प्यात २ ते १० जनावरांची मर्यादा.
दुसऱ्या टप्प्यात क्षमतेनुसार वाढीचा पर्याय.
३०% भांडवल शेतकऱ्याकडून, SHARE CROPPERS सोबतच्या बँकेत ठेव.
७०% कर्ज कंपनी बँकेतून उभं करेल; हमी कंपनीची.
शेतकरी इच्छित असल्यास आपल्या पसंतीच्या बँकेतूनही कर्ज घेऊ शकतो.
SHARE CROPPERS कडील तज्ज्ञांमार्फत जनावरांची निवड.
दूध नियमित राहावे म्हणून जनावरे दोन टप्प्यात दिली जातील.
शेतकरी PPP भागीदार – त्याची गुंतवणूक केवळ जनावरे घेण्यासाठी मर्यादित.
SHARE CROPPERS संपूर्ण व्यवस्थापन व आधारभूत सुविधा उभी करेल.
कंपनी आधुनिक गोठे, यंत्रसामग्री, पाण्याची सुविधा उभारेल.
संपूर्ण व्यवस्था CCTV खाली व ‘Sheti-e-Sanskriti’ अॅपशी लिंक.
दररोजच्या दूध हिशोबाची माहिती शेतकऱ्याला मिळेल.
वार्षिक जनावरनिहाय हिशोब, मासिक उत्पन्न व कर्ज पावत्या.
वर्षाअखेरीला अंतिम ताळेबंद - पूर्ण पारदर्शकता.
जनावर दुभत नसतानाही निश्चित उत्पन्न दिले जाईल.
शेतकऱ्याने आपल्याच जनावरांसाठी हिरवा चारा द्यायचा, त्याचे रोख पैसे मिळतील.
संपूर्ण देखभाल कंपनीकडील पशुवैद्यकीय व तांत्रिक स्टाफकडून.
दुधाच्या दर्जात आणि उत्पादनात कमाल वाढ.
संपूर्ण प्रक्रिया केंद्रीकृत आणि १००% पारदर्शक.
दूध वाहतुकीचा खर्च नाही – नफा वाढतो.
ग्राहकांना थेट व्यवस्था पाहता येते – विश्वास वाढतो व थेट ऑर्डर मिळतात.
बाह्य गुंतवणूकदारांसाठी सविस्तर मॉडेल व बुकलेट उपलब्ध.
प्रत्येक १ एकर शेतीला १० दिवसांचा जैविक सेंद्रिय खत (गोमूत्र-सेंद्रिय स्लरी) वर्षातून मोफत दिला जाईल.